Muki Jhade ( Marathi)
झाडांना आवाज का नाही?
का नाही ते बोलू शकत?
आपल्या मनातले मनोगत
ते सांगू शकले असते
तर ?
तप्त ग्रीष्मात ली म्लान हाक त्यांची
ऐकली असती का काळया ढगांनी?
पर्ण संभाराला गोंजरतांना तृप्तीचा हुंकार ऐकला असता का त्या थेंबांनी?
जीवन दायी त्या हिरव्या छत्री खाली
गुलू गुलू बोलणाऱ्या त्या युगुलाला
जमते हो जोडी म्हणून त्यांनी
डोलावली असती का आपली मान?
कौतुकाने हसल्या असत्या का लवणाऱ्या
फांद्या आणि सळसळणारे पान अन् पान?
ह्या वर्षी फळे जरा छोटीच राहिली बुआ
म्हणून त्यांनी दिलगिरी केली असती का व्यक्त?
त्या फांदिवरची फुलं जास्ती टपोरी बरं का
सांगून मनविला असतं का कोणी भक्त?
आपल्या कुशीत झोपणाऱ्या त्या पाखरांना
गुणगुणली असती का त्यांनी अंगाई?
सावलीत विसावलेल्या पथिकाला अन्
बागडणाऱ्या पिल्लांना हसून सांगितली असती का कथा त्यांनी ?
सांगितलं असतं का त्यांनी की किती
करून काबाडकष्ट
ते देतात आपल्याला आपले खाद्य?
जर ते बोलले असते तर भव्य वटवृक्षाने वाजवली असती का पारंब्यांची वाद्य?
बोलले असते ते तर थांबली असती का
त्यांची निर्घृण हत्या?
उभा आसमंत जर भरून गेला असता
त्यांच्या किंकाळ्यांनी
तर थांबला असता का तो हात,
अविरत दण दण दणके देऊन
त्या सुंदर, उंचउंच दिमाखदार
झाडांच्या पायांवर वार करणारा?
नकोच पण ते.. बरं आहे आहेत ते मुक
कशाला त्यांना माणुसकी द्यायची?
कदाचीत मग त्यांनाही लागली असती आगी सारखी भूक;
जिने ध्वस्त केली असती सृष्टी माणसाप्रमाणे!
नाही त्यांना आवाज म्हणून
झोपू शकतो आपण,
त्यांनी दिलेलं अन्न पचवून, त्यांनी दिलेला प्राण घेऊन
झोपू शकतो आपण..
का नाही ते बोलू शकत?
आपल्या मनातले मनोगत
ते सांगू शकले असते
तर ?
तप्त ग्रीष्मात ली म्लान हाक त्यांची
ऐकली असती का काळया ढगांनी?
पर्ण संभाराला गोंजरतांना तृप्तीचा हुंकार ऐकला असता का त्या थेंबांनी?
जीवन दायी त्या हिरव्या छत्री खाली
गुलू गुलू बोलणाऱ्या त्या युगुलाला
जमते हो जोडी म्हणून त्यांनी
डोलावली असती का आपली मान?
कौतुकाने हसल्या असत्या का लवणाऱ्या
फांद्या आणि सळसळणारे पान अन् पान?
ह्या वर्षी फळे जरा छोटीच राहिली बुआ
म्हणून त्यांनी दिलगिरी केली असती का व्यक्त?
त्या फांदिवरची फुलं जास्ती टपोरी बरं का
सांगून मनविला असतं का कोणी भक्त?
आपल्या कुशीत झोपणाऱ्या त्या पाखरांना
गुणगुणली असती का त्यांनी अंगाई?
सावलीत विसावलेल्या पथिकाला अन्
बागडणाऱ्या पिल्लांना हसून सांगितली असती का कथा त्यांनी ?
सांगितलं असतं का त्यांनी की किती
करून काबाडकष्ट
ते देतात आपल्याला आपले खाद्य?
जर ते बोलले असते तर भव्य वटवृक्षाने वाजवली असती का पारंब्यांची वाद्य?
बोलले असते ते तर थांबली असती का
त्यांची निर्घृण हत्या?
उभा आसमंत जर भरून गेला असता
त्यांच्या किंकाळ्यांनी
तर थांबला असता का तो हात,
अविरत दण दण दणके देऊन
त्या सुंदर, उंचउंच दिमाखदार
झाडांच्या पायांवर वार करणारा?
नकोच पण ते.. बरं आहे आहेत ते मुक
कशाला त्यांना माणुसकी द्यायची?
कदाचीत मग त्यांनाही लागली असती आगी सारखी भूक;
जिने ध्वस्त केली असती सृष्टी माणसाप्रमाणे!
नाही त्यांना आवाज म्हणून
झोपू शकतो आपण,
त्यांनी दिलेलं अन्न पचवून, त्यांनी दिलेला प्राण घेऊन
झोपू शकतो आपण..
© वंदना तुळजापूरकर जकाती
nagpur
Good! Thoughtful verse.... it's true how unmindful people are towards the flora!
ReplyDeletedhanyawad
Deleteखूप सुंदर
ReplyDeletedhanyawad
DeleteBeautiful. A home truth told in a sensitive manner.
ReplyDeleteThanks Medha. means a lot
Delete