राहुल चे गाणे... poem about a great concert of Pt Rahul Deshpande @ Nagpur in 2019
राहुल चे गाणे तो गान गान होता मी कान कान झाले रंध्र रंध्रा तूनी माझ्या राहुलचे गाणे टिपले मोकळे भव्य पटांगण रसिकांची होती गर्दी पण मी मात्र एकटीच दूर दूर वेगळी अगदी त्याचे सूर भरुनी राहिले सखोल स्वरसागरा सम लाटांवर लाटा आदळती मोगऱ्याच्या गंधासह झुळूक येई शीतल शी पायाशी मऊ मृदू धरा स्थिर राही ना पाय माझे चालती ते तरातरा गर्द काळया आकाशी होते रुपेरी ढग काही बनुनी फाक कलिंगडाची ऐके तो शुभ्र चंद्र ही गरजणारे कधी कातर कधी लडिवाळ ते सूर सूर पखवाज तबल्याची थाप ऐकता भरले ऊर ऊर वेगवेगळी झाडे देखील स्तब्ध चकित त्या वर्षावात रोमांचित बकुळ तारे झडती दाद देता कौतुकात चहू दिशांनी वेढले त्या आवाजाने सर्वांना भारून टाकले वेड लावले अद्भुत गायक मस्ताना तालासोबत पावले माझी उठती किंवा कधी थांबती मीच स्वरमय होऊन गेले विसरुनी गेले सर्व जगती आलाप ताना सूक्ष्म कंपन स्वरलहरी पोहचती थेट चंद्राला करून स्पर्श एकदा परतून येती किरणां समेत बेधुंद बेहोश स्वरमग्न मी विसरुनी गेले देहभान अद्वितीय विलक्षण अनुभव स्वर्गीय संगीताचे रसपान कित्येक बैठकी ऐकील्या हो हा थरार होता अकल्पित मीच चंद्र मीच धरा मीच गाणे होऊन गेल...