Aaiche Phoolpakharu ( Marathi)

आईचं फुलपाखरू


ती गेल्यापासून घरी दारी बागेत
एक सुंदर काळे फुलपाखरू
असतं आजूबाजूला
कधी घरात येतं, कशी झाडावर असतं
कधी गाडीवर, कधी बाजूला, कधी डोक्यावर, कधी समोर तरल पणें
आपली ओळख पटवून देत असतं.
तिचं मन आहे का हे माझ्या आजूबाजूला?

तिचं अस्तित्व तर आहेच माझ्या अस्तित्वात
तिनी राखलेल्या वास्तूत
तिनी सोडलेल्या आठवणीत
तिचं स्पर्श, तिचं हसू, तिची काळजी;
तिची भक्ती आणि तिचा आशीर्वाद
सगळ्या दुखांना आवळून घेणारा तिचा हात
सगळं मळभ पुसून काढणारा तिचं पदर
कोसळलेल्या आभाळाला सावरून घेणारी तिची नजर
अकालनिय आणि समजुतीच्या पलिकडली तिची ओढ
तळपणारी तिची देदीप्यमान ज्योत

ते काळ फुलपाखरू दिसलं की काहीतरी खूण मिळते
तिचं मन गुंतल आहे का माझ्यात ?
प्रवासाला निघालेल्या माणसाने नाही अडकून पडावं
सरळ मागचं सगळं सोडून पुढेच निघून जावं

त्या फुलपाखरा ने अशीच रुंजी घालावी
पण त्यात मात्र ती नसावी..

सारखं भिरभिरत ते पाखरू मागेपुढे
खरंच का ते भिरभिरत की खेळ आहेत ते खुळ्या मनाचे?


Comments

Popular posts from this blog

Mom ( English)

Muki Jhade ( Marathi)