Mazi Ti ( Marathi) My Mom
माझी ती..
गार वारा सुटला होता
पाने सुखात डोलत होतीशुक्रतारा चमकत होता
पण त्यात माझी ती नव्हती
पोट पूजा ही चालू होती
फोना वरती फोन ही होते
आप्त स्वकीय जवळी होते
पण माझी ती त्यात नव्हती
चमकणारे माझ्यासाठी नेत्र ही होते
डोई वरती फिरणारा हात ही होता
मला हृदयाशी धरणारी छाती होती
पण त्यात माझी ती कुठेच नव्हती
अंत यात्रेसाठी निरोप देऊन आले
त्याच्या हातात सोपवून आले
एक जीवनाध्याय पूर्ण करून आले
माझ्या विसव्याला विस्तवात सोडून आले
आता जग हे असेच चालणार
मी हसणार गाणार पुढेच जाणार
निर्विकार पृथ्वी घिरट्या घेणार
पण माझी ती त्यात नसणार..
Comments
Post a Comment